जालना । जांब समर्थ गावातील श्रीराम मंदीराच्या गाभाऱ्यातुन राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देव देवतांच्या पंचधातुच्या पुरातनकालीन मुर्त्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्या आहे. दरम्यान, या चोरी बाबत माहिती देणाऱ्यास जालना पोलीस दलाकडून 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 21 ऑगस्ट रोजीच्या रात्री जांब समर्थ गावातील श्रीराम मंदीराच्या गाभा – यातुन राम , लक्ष्मण , सीता , हनुमान या देव देवतांच्या पंचधातुच्या पुरातनकालीन मुर्त्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्या आहे. अशी तक्रार मंदिराचे पुजारी धनंजय वसंतराव देशपांडे यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरुन पोलीस ठाणे घनसांवगी येथे गु.र.नं. 313/2022 कलम 457,380 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास स्थानिक शाखा जालना हे करीत आहे . सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुर्त्या व चोरांबाबत उपयुक्त माहिती देणाऱ्यास जालना पोलीस दलातर्फे 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे . तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , त्यांना गुन्हा उघडकीस येण्याच्या काही उपयुक्त माहिती असल्यास , खालील क्रमांकावर किंवा स्थानिक गुन्हे शाखा जालना येथे प्रत्यक्ष येवून संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.