जालना । प्रत्येकाच्या आयुष्यात संतांची शिकवण मार्गदर्शक ठरत असते प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतःची ओळख निर्माण करून स्वतःसह समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा त्यासाठी संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचे जीवन कार्य प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले.
मंठा तालुक्यातील कर्णावळ येथे संत सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी श्री राहुल लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर महंत योगानंद महाराज,
गणेशराव खवणे, सतीश निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेश घारे, सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
संतांच्या सानिध्यात मोक्ष आणि सद्गती प्राप्त होते त्यामुळे उपदेशाप्रमाणे आपले जीवनकार्य चालवावे त्यासोबतच समाजासह गावाच्या विकासावर देखील भर द्यावा संतांनी महंतांच्या सूचनांचे पालन करावे त्याशिवाय तरणोपाय नाही असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले.
सत्संगतीचा महिमा अपार आहे. सत्संगतीने आपल्या सद्बुद्धीत वाढ होते. यासाठी संतांची संगती करायला शास्त्रात आग्रहपूर्वक सांगितले आहे. संताचा प्रत्यक्ष सहवास मिळाला तर उत्तमच संतसंगतीमुळे आत्मज्ञानाची तळमळ शांत होण्यास मदत होते तसेच संतांच्या संगतीने आध्यात्मिक प्रगती साधता येते. त्यासाठी प्रत्येकाने सदगुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्य अंगिकरावे असेही राहुल लोणीकर यावेळी म्हणाले.
यावेळी उद्धव पवार, अविनाश चव्हाण, नागेश घारे, विठ्ठलराव काळे, प्रसादराव बोराडे, माऊली गोंडगे, विलास घोडके, राजेभाऊ खराबे, सुभाषराव बागल, नवनाथ चट्टे, मनोज देशमुख, ज्ञानेश्वर राठोड, भगवान राठोड, कैलास चव्हाण, भीमराव राठोड, नायबराव गोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.