जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक संपन्न

36

जालना । महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे गुरुवार(दि.13) रोजी महासंपर्क अभियानांतर्गत जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी मनसे जिल्हा अध्यक्ष रवींद्र राऊत यांचे ‘राजगड’ या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना केल्या. तसेच यावेळी जास्तीत जास्त संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र राऊत यांनी या बैठकीत केले. या बैठकीस उपजिल्हाध्यक्ष मांगदरे, शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे, विवेक वैद्य, राम पाटोळे, वैभव साळे, सोमनाथ कदम, गजेंद्र लाखोले, शुभम भालेराव, अमोल मिसाळ, नितीन कदम, जगदीश चौंडिये, विलास तिकांडे, अक्षय जाधव, ब्राह्मदेव गुंजकर, मयूर गोफने आदींसह इतरांची उपस्थिती होती.