पतसंस्था फेडरेशन तर्फे जालन्यात रविवारी प्रशिक्षण शिबिर

41

जालना । महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जालना जिल्हा नागरी व कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांच्या संचालक, अधिकारी वृंदासाठी रविवारी ( ता. 16) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील हॉटेल सॅफ्रॉन येथे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दादाराव तुपकर यांनी दिली.

प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी ( ता .11) फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दादाराव तुपकर यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.या वेळी उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, डॉ .विठ्ठल पवार,संजय भरतीया, अभय कुलकर्णी, प्रसन्न जाफ्राबादकर,ज्ञानेश्वर काळे, दीपक तुपकर, भगवान जायभाये,सतीश निर्वळ यांची उपस्थिती होती.

रविवारी सकाळी 10.00 वा. जिल्हा उपनिबंधक पी.बी.वरखडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल .यावेळी सहाय्यक निबंधक शरद तनपुरे, सत्कारमूर्ती तथा राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पतसंस्थांशी निगडित एम .आय.एस.,सी .आर .ए. आर. , पतसंस्था व महिला सबलीकरण, पतसंस्था समोरील आव्हाने अशा विविध विषयांवर परिसंवादात उपनिबंधक पी. बी. वरखडे, शिरीष पोळेकर ( पुणे), ॲड. सौ .अंजली पाटील ( फेडरेशन संचालिका),राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या वेळी दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त पतसंस्थांचा गौरव व सत्कार केला जाणार असून जिल्ह्यातील पतसंस्थांचे अध्यक्ष, सचिव, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष दादाराव तुपकर यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.