जालना । पारडगाव ता. घनसावंगी येथे पंधरा व्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची होत असून या कामांची चौकशी करून दोषींविरूध्द कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते सिमोन सुतार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली आहे.
या संदर्भात सोमवारी ( ता. 10)मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे, पारडगाव येथे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत रस्ते, भुयारी गटार,पाईपलाईन ची कामे सुरू असून सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने सदर कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तरी सदर कामांची सखोल चौकशी करून दोषींविरूध्द कार्यवाही करावी अशी मागणी सिमोन सुतार यांनी केली आहे.