जालना । छत्रपती संभाजी महाराज नगर परिसरातील श्री. बालाजी मंदिर संस्थान च्या वतीने नवरात्री निमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाची कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रविवारी (ता.09) महाप्रसादाने उत्साहात सांगता झाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थानच्या वतीने ब्रह्मोत्सव अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. अभिषेक, विधीवत पूजा, महाआरती, नंतर मुख्य यजमान, दैनिक यजमान, तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मोतीराम अग्रवाल मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत ,मुख्य यजमान अग्रविभूषण सुभाषचंद्र देविदान , शैलेश देविदान, कश्मीरीलाल अग्रवाल, माजी. आ. वसंत शिंदे,सौ. सुशीलाताई दानवे,सौ. जगताप, नारायण चाळगे,कांतीलाल राठी, सी. ए. गोविंद प्रसाद मुंदडा, ह. भ .प.निवृत्ती महाराज पाचफुले, राजेश राऊत,प्रकाश जगताप,विष्णू पाचफुले, मुन्ना गजबी,कारभारी वाघ, गणेश राऊत, विठ्ठलराव घुले ,जगन खडके, हिरालाल पिपरिये,पांडुरंग काळे,जगदीश खट्टर, सुखदेव बजाज,ञिभूवन राऊत, सुखदेव सराफ, मनोहर सिनगारे,संजय राऊत, भिषण बजाज, सुरेश राऊत,अरूण मसाने,दिगंबर पेरे, शिंदे,यांच्यासह महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.