आयोगाने दिले शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर ठाकरे गटाला कोणते दिले ते पहा?

166

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे . आपल्या पक्षाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव मिळावं, अशी मागणी दोन्ही गटांकडून करण्यात आली होती. आज अखेर निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव शिंदे गटाला दिले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने चिन्हांबाबतही निर्णय दिला आहे. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिले आहे. तर शिंदे गटाचे तिन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असे आदेश निवडणूक आयोगाने शिंदे दिले आहेत. शिंदे गटास उद्या मंगळवारी सकाळपर्यंत तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत, त्यानंतर निवडणूक अयोग चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.