युवा नेते राहुल गवारे यांना पुरस्कार

40

जालना । कुंबेफळ ता. जालना येथील युवा सेनेचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे निष्ठावंत राहुल गवारे यांना युवा सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बदनापुर येथे छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते राहुल गवारे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी आ. नारायण कुचे, आयोजक तथा शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पंकज जऱ्हाड पाटील, देवकर्ण वाघ पाटील आदींची उपस्थिती होती.

राहुल गवारे यांनी कुंबेफळ गावात छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा,भुयारी गटार, लसीकरण अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल घेत गौरव करण्यात आला. दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, सचिन क्षीरसागर, विश्वंभर तिरूखे, शिवाजी शेजुळ, जनार्दन चौधरी, ज्ञानेश्वर ढवळे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.