जालना :- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत नेहरू युवा केंद्र जालनाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.
परतूर तालुक्याच्या प्रतिनिधी स्वयंसेवक रुपाली भापकर यांनी लोकसंख्या दिवस, कॅच द रेन 3.0 व बालविवाह निर्मूलन संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख डॉ. शरद भापकर यांनी शेतकरी वर्गाला सामोरे कसे जावेत व वृक्षारोपण काळाची गरज आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे लोकसंख्या म्हणूनच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन ही काळाची गरज आहे, असे रुपाली भापकर यांनी सांगून बालविवाह केल्यास काय परिणाम होते याबद्दल मार्गदर्शन केले व शपथ दिली. आनंदवाडी वेल्फेअर फाउंडेशनचे विशेष मार्गदर्शन लाभले व यावेळी प्रमुख मंगलाताई भापकर, डॉ. शरद भापकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.