उपचारासाठी दाखल आरोपी कैदी रुग्णालयातून पळाला

178

जालना । जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या जिल्हा कारागृहातील एका कैद्याने पोलीसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून चक्क पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. मुकीद शेख कासम असे या आरोपी कैदीचे नाव असून शहागड येथील बँक दरोडा प्रकरणातील हा आरोपी असल्याचे समजते.

जालना जिल्हा कारागृहातील कैद्यास शनिवारी(दि. 8) रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आरोपी कैदीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी 4 च्या सुमारास आरोपी कैदीने कारागृह अंमलदाराची नजर चुकवत रुग्णालयातून पळ काढला. सदरील प्रकार कारागृह पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी संपूर्ण रुग्णालय परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपी मिळून न आल्याने अखेर रात्री उशिरा कारागृह पोलिसांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.