जालना । जालना जिल्ह्यातील मौजपुरी शिवारातील दिलीपराव जाधव यांच्या शेतात आज तब्बल साडेबारा फूट लांबीचा, 25 किलो वजनाचा अजगर आढळून आला आहे. सर्पमित्रांनी अजगरास शिताफिने पकडून वनविभागाच्या स्वाधीन करत जंगलात सोडून दिले आहे.
मौजपूरी शिवारात मोठा साप असल्याची माहिती सर्पमित्र गोकुळ लाड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ दिनेश प्रधान, गोपीनाथ ढोले व सहकाऱ्यांसह राठोड यांच्या शेतात धाव घेतली. आपल्या कौशल्याने चपळ अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे, वनपाल सतीश बुरकुले, वनरक्षक गणेश तेलांगडे, भाटसोडे , अविनाश पगारे यांच्या सहकार्याने सुरक्षित पणे जंगलात सोडण्यात आले. या वेळी तुकाराम जाधव, राजू सारडा यांची उपस्थिती होती. सर्पमित्रांच्या कामगिरी मुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडत त्यांचे आभार मानले.