जमाअत-ए-इस्लामी हिंद जालना तर्फे प्रेषित परिचय संमेलन उत्साहात संपन्न

चारित्र्यसंपन्न लोकांचा आदर केला तरच! देशाची प्रगती- भास्कर राव आंबेकर

251
दिनांक: ७ सात ऑक्टोबर जमाअत-ए -इस्लामी हिंद जालना च्या वतीने “पैगंबराच्या शिकवणीची देशाला गरज” समाजामध्ये प्रेम, सद् भाव टिकवण्यासाठी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये पैगंबर( स०) परिचय संमेलन कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये मान्यवरांनी आपले विचार मांडले. मा. भास्कर आंबेकर (शिवसेना जिल्हाप्रमुख) ,मुख्याध्यापक जिजा वाघ सर,मा. प्रदीप घाटे शाही सर, मा. नारायण भुजंग सर, अब्दुल मुजीब सर, मा. इकबाल पाशा साहेब, डॉ. एस. पी. निर्मल
मा. भास्कर आंबेकर साहेब यांनी सांगितले की, धर्म संस्था व राज्य संस्था यामध्ये राज्यसंस्थेचा खूप प्रभाव आहे, धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जाते. सध्याच्या परिस्थितीत चारित्र्याला महत्त्व नाही, चारित्र्यसंपन्न लोकांचा आदर केला गेला पाहिजे. विश्वासाचं नातं घट्ट केलं गेलं पाहिजे.
मुख्याध्यापक जिजा सर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पैगंबर (स०) यांची शिकवण खूप मौल्यवान आहे. ते दयासागर होते, शत्रूंना माफ करणारे होते.
प्रदीप घाटे शाही सरांनी आपले विचार मांडताना सांगितले की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी व्याज रहित व्यवस्था स्थापन केली. मानवाला जोडण्याचे काम केले.
अब्दुल मुजीब सर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, भारत जगात सर्वात मोठा लोकतंत्र देश आहे. बऱ्याच क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय आहे. परंतु बरेच निराश जनक पैलू आहेत. 97% पैसा 7% लोकांकडे आहे, श्रीमंत भारत आणि गरीब भारत त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे. यासाठी त्यांनी पाच सूत्री हा फार्मूला सांगितला.
नारायण भुजंग सर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, प्रेषितांच्या
शिकवणीने बदललेला अरब
दारू मुक्त, चोरी मुक्त, महिला वरील अत्याचार मुक्त, विधवा महिलेशी लग्न असे अनेक बदल त्यांनी घडवून आणले.
डॉ. एस पी निर्मल यांनी सांगितले की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एक ईश्वर वादाची शिकवण दिली. विज्ञानाने खूप प्रगती केली परंतु सदाचारी वर्ग स्वर्गात जाईल आणि दुराचारीवर्ग नरकात जाईल.
मा. इकबाल पाशा साहेब यांनी सुद्धा आपले विचार मांडले …मीडिया बद्दल त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
अध्यक्ष भाषणामध्ये इंजिनियर वाजेद कादरी साहेब यांनी पैगंबराच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की , सर्वप्रथम मानवाला निर्मात्याशी जोडल . यामुळे मानवामध्ये अद्वितीय क्रांती घडवून आणली. स्वतंत्रता, समता, न्याय, बंधुता या मूल्यांची शिकवण आपल्या अनुयायांना दिली. एक आदर्श समाजाच उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवलं. प्रेषितांचे विचार देशाच्या प्रगतीसाठी खूप बहुमोल आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज तहेसीन यांच्या कुराण पठणाने झाली. भाषांतर शेख सलीम यांनी केले. प्रस्ताविक आमीरे मुकामी शेख इस्माईल व सूत्रसंचालनाची जबाबदारी इल्यास खान सर यांनी पार पाडली.
शेवटी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि श्रोत्यांचे काझी गालेब (सचिव) संदेश विभाग यांनी आभार मानले.