जालना: नीट परीक्षा 2023 तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जालना शहरातील मणियार मोहल्यात सत्कार करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मनियार बिरादरीतर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राध्यापक अब्दुल रहीम अरमान मनीयार, डॉ.सलीम नवाज मणियार हाजी विखार, नबील सर व मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीट परीक्षेत यश प्राप्त करणारी मिस्बा अन्वर खान ह्या तरुणचा विशेष सत्कार करण्यात आला, यावेळी मिस्बा हिणे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. उपस्थित मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुट्टीत वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यासाला वेळ द्यावा. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव न टाकता त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना द्यावे.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली. यावेळी मन्यार बिरादरीतर्फे उपस्थित 30 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हमीद मणियार अजीज मनीयार अन्वर मणियार राहील मणियार वसीम मणियार फिरोज मणियार इम्रान मनीयार समद मनीयार मजहर मनीयार समद मनीयार फेरोज अहेमद आदींनी परिश्रम घेतले.