37 बार रक्तदान किया; मुख्यमंत्री की ओर से कृष्णा सोनवणे को बधाई

22

परतूर – परतूर शहरातील रामेश्वर गल्ली येथील रहिवाशी कृष्णा विठ्ठलराव सोनवणे यांनी 38 वर्षात 37 वेळा रक्तदान केले आहे. रक्तदाना सारख्या समाजोपयोगी उपक्रमात दिलेल्या उल्लेखनीय योगदाना बद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोनवणे यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. मानवी रक्तदाचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. एखाद्याला जीवदान देण्याचे सामर्थ्य असणारे हे दान प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने करायला हवे परंतू, रक्तदानासाठी दात्यांना वारंवार आवाहन करावे लागते. अशा स्थितीत 38 वर्षाच्या वयात 36 वेळा रक्तदान करून आपण एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.आपल्या कार्याने इतरांना प्रेरणा मिळू शकेल असे उदाहरण निर्माण केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या कृष्णा सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.