शासन आपल्या दारी कार्यक्रमातून नागरीकांनी विविध दाखल्याचा लाभ घ्यावा : अमित उजगरे

15
बोरघर – शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत मा. जिल्हाधिकारी रायगड यांच्या सुचनेनुसार माणगांव उप विभागीय अधिकारी उमेश बिरारी व तहसिलदार विकास गारुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सजा खरवली येथे विविध प्रकारच्या दाखल्यां संबंधी अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
       शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत नागरीकांना वय, अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉनक्रिमीलेअर दाखला, तात्पुरता रहिवास दाखला, ज्येष्ट नागरीक दाखला, अल्पभूधारक दाखला, भूमीहीन दाखला, शेतकरी दाखला, डोंगरी दाखला, ७/१२ प्रमाणीत प्रत, प्रकल्प बाधीत दाखला, नवमतदार, मतदान ओळखपत्र, पी. एम. किसान अर्ज, शिधापत्रिका इत्यादी दाखले वाटप करण्यात येत असून खरवली सजेतील उमरोली त. खरखली, खरवली, चेरवली, पेण त. तळे, बोरघर त. खरवली व आमडोशी या गावातील नागरीकांनी शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन खरवली सजेचे तलाठी अमित उजगरे यांनी केले आहे.