छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे 30 मे रोजी आयोजन

9

जालना :  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 30 मे रोजी सकाळी 9.00 वाजता  वर्कशॉप क्र. 2 आय.टी.आय. चंदनझिरा परिसर जालना येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

        या शिबीरामध्ये  10 वी व 12 वी नंतर काय करावे तसेच भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्त्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे.

     तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठी, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक व वित्तीय संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.