जालना | प्रतिनिधी- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संपुर्ण देशासह राज्यामध्ये फुले-शाहु-आंबेडकरांचे विचार रूजविले आहे. नवतरूण पिढीने फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांची लोक चळवळ उभी करण्याचे अत्यंत गरज असल्याचे जालना येथे आयोजीत बैठकीमध्ये विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगीतले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जालना जिल्हा युवक शाखेच्या वतीने शनिवार रोजी काद्राबाद दर्गा वेस येथे संघटात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे नेते डॉ. पंडीतराज धानुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब करडक, ॲड. सुभाष राऊत, ज्येष्ठ नेते रवि सोनवने, राज्य प्रचारक डॉ. नागेश गवळी, प्राचार्य संतोष विरकर, प्राचार्य ज्ञानेश्वर दराडे, विभागीय अध्यक्ष आबा खोत, अनिल नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे जिल्हा युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, सुंदराव कुधळे, लक्ष्मण हरकळ यांनी शाल-पुष्पहार देवून सत्कार केला. यावेळी बोलतांना प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जागरूक करून त्यांचे न्याय हक्क मिळून देण्यासाठी परिषदेच्या कार्यकर्त्यांचं मोठ योगदान आहे. परंतू यापुढे ओबीसी समाज हा एकवटला पाहिजे. जेणे करून समता परिषदेची शक्ती दिसून यायला पाहिजे. नवतरूण मंडळींनी फुले-शाहु-आंबेडकरांचे विचार आत्मसात करून अंमलात आणत नाही तोपर्यंत ओबीसींना न्याय मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने एकजूट राहायला पाहिजे. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ. पंडीतराव धानुरे म्हणाले की, जालना येथे समता परिषदेचा पहिला राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला होता. आणि या मेळाव्यामधूनच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींच्या आरक्षणाची घोषणा केली होती आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे आरक्षणाचे प्रणेते ठरले. आजही जालना जिल्हा येथून भुजबळ साहेबांचे विचार संपुर्ण राज्यात प्रेरणादायी ठरून एैतिहासीक घटना मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात घडल्याने आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे डॉ. धानुरे यांनी सांगीतले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले या बैठकीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी केले. यावेळी बापु गाढेकर, माजी जि. प. सदस्य रामचंद्र फुलझाडे, बाबासाहेब सोनवने, गणेश वाघमारे, वैजिनाथ राऊत, सुनिल झोरे, ज्ञानेश्वर धानुरे, किशोर खराडे, संतोष रासवे, पांडुरंग शिंदे, अनिल वाघमारे, दगडू बडदे, जफर मिर्झा, मनोज ताल्ला, गोविंद राजपुत, सचिन जाधव, शेख शाबाज, अंकुश शिंदे, समर्पण सेनानी, गोविंद सोनवने, रामेश्वर गाढेकर आदी समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनोज ताला यांनी केले. उपस्थितांचे बाबासाहेब सोनवने यांनी आभार मानले.