बीआरएस पार्टीची एक महिन्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात

32

जालना : जालना येथे भारत राष्ट्र समितीच्या वतीने जालना जिल्ह्यात एक महिन्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार असल्याचा विश्वास मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात व्यक्त केला.
जालना येथे आज शासकीय विश्रामगृहात बीआरएस पक्षाच्या सभासद नोंदणी आढावा बैठक मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात  यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख प्रविण फुके-पाटील,विधानसभा जालना समन्वयक अशोक अंभोरे, बदनापूर विधानसभा समन्वयक राजू वायाळ, भोकरदनचे विधानसभा शिवाजी इंगळे, सहदेव बनकर, परतुर विधानसभा समन्वयक प्रल्हाद सोळंके, घनसावंगी विधानसभा समन्वयक संजय सोळंके, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब कदम,श्याम शिरसाट, सुभाष आधूडे. माऊली काकडे, महादेव घुले,बबन गवारे,
दीपक वर्शील, किशोर शेजुळ, पाडोले, राठोड व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मराठवाडा समन्वयक म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समितीच्या पक्षाच्या वतीने २८८ विधानसभा मतदार संघामध्ये पक्षाचे ध्येय धोरणे, पक्षाने तेलंगना राज्यामध्ये जनकल्याण, कृषी कल्याणाचे मॉडेल जे राबविले आहे अनेक जन कल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. या योजनांची माहिती गावो-गावात देणे, आणि माहिती दिल्यानंतर प्रत्येक गावामधून पक्षाची सभासद नोंदणी करणे या हेतून संपुर्ण महाराष्ट्रात काम चालू झाले आहे. संपुर्णपणे एक महिन्याभर ही एक मिशन म्हणून काम केले जाणार आहे. जालना जिल्ह्यात जे काम चालू ते खुप समाधानकारक आहे.  एक महिन्यात एक लाख सभासद नोंदणीचे काम पुर्ण होईल, असा विश्वासही मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांनी व्यक्त केला.