स्त्री समस्या निराकरणासाठी राज्य सरकार सदैव तत्पर- आमदार संतोष पाटील दानवे

94
जाफराबाद | प्रतिनिधी – स्त्री हा समाज घटकातील अतिशय मानाचा व महत्त्वाचा घटक समजला जातो. स्त्रिया, महिलांच्या उद्धाराशिवाय समाज प्रगतीपथावर घेऊन जाणे कठीण आहे.
दैनंदिन जीवनात वावरत असताना उपेक्षित असलेल्या स्त्रियांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. या चारुसंगाने राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून मी सदैव तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला अडी-अडचणीत मदत करण्यासाठी सदैव तुमच्या सोबत असून केंद्र व राज्य सरकार यांच्या असंख्य अशा चांगल्या योजना आहेत या योजनेचा आपण लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार श्री.स्वरूप कंकाळ साहेब, मा. गटविकास अधिकारी श्री बोडके साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश दिवटे सर, संतोष पाटील लोखंडे, पंचायत समिती माजी सभापती दगडूबा अण्णा गोरे, साहेबराव मामा कानडजे, देविदास देशमुख,राजु साळवे, संतोष ठाकरे,मा.बालविकास प्रकल्प अधिकारी श्री विनय साळवे सर, मा.तालुका वैदयकीय अधिकारी श्री.सोनटक्के साहेब , विस्तार अधिकारी दंदाले सर, संरक्षण अधिकारी श्री अशोक भुसारी सर,श्री सुनील खंदारे सर सर्व पर्यवेक्षिका श्रीमती गिरी मॅडम ,श्रीमती दांडगे मॅडम, श्रीमती गोफणे मॅडम, श्रीमती हिस्सल मॅडम तसेच इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  महिला आर्थिक विकास महामंडळ चे श्रीमती मीना साळवे , श्री .रघुनाथ पंडित यांनी उपस्थिती लावून त्यांचा स्टॉल लावला तसेच विधीसेवा प्राधिकरण ,तहसीलदार कार्यालय,भूमिअभिलेख कार्यालय,आरोग्य अधिकारी कार्यालय ,तालुका कृषी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व अभय केंद्र संरक्षण अधिकारी कार्यालय,नगर पंचायत कार्यालय या सर्व कार्यालयांनी स्टॉल लावण्यात आले होते .
शासनाने पुढाकार घेऊन महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्री शक्ती समाधान शिबिराबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.