आखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी मंगल कोरडे यांची नियुक्ती 

91
परतूर | प्रतिनिधी – शहरातील नागवंश नगर भागातील रहिवासी मंगल नामदेव कोरडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जालना जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी ही नियुक्ती केली  केली आहे. रविवारी जालना येथे आयोजित एका कार्यक्रमात कोरडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश महिला संघटक अनुराधा ठाकरे यांनी यांच्यासह इतर पदाधिकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठा समाजातील महिलांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील रहावे. समाजातील जास्तीत जास्त महिलांना मराठा महासंघाच्या विचाराशी जोडण्याचा प्रयत्न करावा असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
मंगल कोरडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.