जालना | प्रतिनिधी : भाजप तर्फे व्यापक जनसंपर्क अभियान ३० में ते ३० जून पर्यंत महा-जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आज दि.२८ में रोजी भारतीय जनता पक्ष कार्यालय, संभाजीनगर, जालना येथे जालना शहर व ग्रामीण ची बैठक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेऊन आराखडा तयार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांनी बैठकीत सांगितले की, महा जनसंपर्क अभियान हे भाजपचे सर्वात मोठे अभियान आहे. याद्वारे प्रत्येक कार्यकर्ता बूथ स्तरावर जनसंपर्क करून केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना, कामे, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देणार आहे. यासोबतच परिषद आणि जाहीर सभांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. तो यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्साहाने कामाला लागावे. भाजप हा कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे, कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे जो सदैव माता भारतीला परम वैभवापर्यंत नेण्याचे काम करतो. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक वर्गासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि अंत्योदय या मूळ मंत्रावर काम केले आहे. कार्यकर्त्यांची निर्मिती करणे आणि त्यांना देशसेवेसाठी प्रेरित करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले.
यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, सौ.संध्याताई देठे, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अतिक खान, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, बाबुराव मामा खरात, सतीश जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, भाजयुमो शहराध्यक्ष सुनील खरे यांच्यासह या बैठकीस प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, जि.प./प.स.सदस्य, मंडळ अध्यक्ष, मोर्चा व आघाडी/सेल अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व शक्तीकेंद्र विस्तारक व बुथ प्रमुख बंधु भगींनी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.