जालना | प्रतिनिधी- बंगलोर येथे 22 ते 26 मे दरम्यान पार पडलेल्या 18 वर्षाखालील राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत जालना येथील पवन सतीश कोळी याने उपविजेतेपद पटकावून जालन्याचा नावलौकिक वाढविला आहे.
पवन कोळी याने या पूर्वी देखील औरंगाबादेत झालेल्या विभागीय स्पर्धेत पवन कोळी द्वितीय राहून त्याची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली होती. पवन कोळी हा एसआरपीएफ मधील जवान सतीश कोळी यांचा मुलगा आहे. त्याने यापूर्वीही इतर स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविलेले असून, राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारण्याचा त्याचा प्रयत्न असून टेनिसमध्येच करिअर करण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण नवयुवक विद्यालयात झालेले असून, त्याने यावर्षीच दहावीची परीक्षा दिली आहे.आपण टेनिसमध्ये नाव उंचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तो म्हणाला. पवन हा नियमित सराव हैदराबादच्या अकॅडमीमध्ये करत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.