पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मंगळवारी जालन्यात  विविध उपक्रमाचे आयोजन

16
जालना- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जालना शहरात दिनांक ३० मे रोजी विविध कार्यक्रम- उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      याबाबत अधिक माहिती देतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा गंगाधर गायके यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक ३० मे रोजी जनावरांना चारा वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच अन्नदान करण्यात येणार आहे. सांयकाळी५-३० वाजता गांधी चमन येथे जयंतीचा मुख्य कार्यक्रम मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, याठिकाणी विशेष रोषणाईचा शो सुध्दा आयोजित करण्यात आला आहे.
        जालना शहरातील नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही अध्यक्ष कृष्णा गंगाधर गायके यांच्यासह अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अक्षय आटोळे, भगवानराव माथले,बाळू तिरुखे,उपाध्यक्ष सौरभ भिसे, कार्याध्यक्ष गजानन आढाव, राम जोशी, सचिव ज्ञानेश्वर भुसारे,गोविंद मदनुरे, कोषाध्यक्ष शिवराम वीर, सिध्देश्वर जराड, यादव बकाल, गजानन जोशी,आदींनी केले आहे.