समता परीषदेच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकर झरेकर याची नियुक्ती

20

परतूर | प्रतिनिधी- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जालना  जिल्हाअध्यक्षपदी मधुकर झरेकर याची नियुक्ती करण्यात आली.शनिवारी (ता.२७) रोजी जालना येथे समता परीषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. जेष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक,ऍड सुभास राऊत,प्रदेश प्रचारक नागेश गवळी,विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत राविभाऊ सोनवणे, प्राध्यापक संतोष विरकर, दीपक वैद्य, रावसाहेब राऊत,मिर्झा अनवर बेग, डॉ.विशाल धानुरे, बाबासाहेब वानखेडे, संतोष जमधडे, दशरथ तोंडोळे
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी यांनी मा.ना.छगनराव भुजबळ यांच्या आदेशानुसार बाळासाहेब कर्डक  यांनी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली.
यावेळी मोठ्या संख्येने समता बांधव उपस्थित होते.दरम्यान,निवडी बदल माजी मंत्री राजेश टोपे,जिल्हाअध्यक्ष कपिल आकात,मा.नगराध्यक्ष विनायक काळे आदींनी अभिनंदन केले.