टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील नळ पाणीपुरवठा दहा ते बारा दिवसापासून बंद नागरिकांना पिण्याच्या पाणीपुरवठा उन्हाळ्यामध्ये पुन्हा डोक्यावर हाडं जंगलात भटकंती करावी लागत आहे डोणगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक पाच ते सहा विहिरी असून उन्हाळा असल्याने जमिनीची पाणी पातळी खोल गेल्याने तळ उघडे पडले असून त्यामध्ये जलस्वराज प्रकल्पातून एक पुरवठा सावखेडा भोई येथून डोणगाव गावाला सध्या पाणीपुरवठा होत होता त्या पाणीपुरवठ्याची विद्युत पंप , नादुरुस्त असल्यामुळे गावाला दहा ते बारा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामपंचायत च्या वतीने सार्वजनिक विहिरीवर जाऊन विद्युत पंप काढून दुरुस्ती करण्यास काम चालू आहे
सविस्तर अशी की योजना अंतर्गत गावाला पाणीपुरवठा
गावातील पाणीपुरवठा 10 दिवसापासून मोटार खराब असल्याने बंद आहे, त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दि 27. शनिवारी रोजी सावखेडा भोई येथील सार्वजनिक विहिरीवरील विद्युत मोटर दुरुस्ती पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता सार्वजनिक विहिरीवर ग्रामसेवक सुरेंद्र भांडारे , गंगाधर खरात, बाबासाहेब पुंगळे, मारोती रजाळे, मनोज पिंपळे, आदींची उपस्थिती होती
डोणगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सावखेडा भोई येथून गावाला पाणीपुरवठा होत आहे दहा ते बारा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने उन्हाची तीव्रता ते लक्षात घेऊन सार्वजनिक विद्युत पंप विहिरीच्या वर काढून दोन ते तीन दिवसात पुरवठा सुरळीत होईल
– ग्रामसेवक सुरेंद्र भांडारे डोणगाव ग्रामपंचायत