प्रहार संघटनेचे शिवाजी सवने यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

45
परतूर | प्रतिनिधी – परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बप्पा सवने यांनी दि.२९/०५/२०२३,रोजी काँग्रेस कार्यालयात त्यांच्या अनेक समर्थकांसह मा.आ.सुरेशकुमार जेथलीया यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बप्पाना चालू असलेली सामाजिक चळवळ अविरत ठेवण्या संदर्भात सर्वांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष बाबाजी गाडगे, इंद्रजित घनवट, सुरेश सवने,राजेश भुजबळ, सरपंच सोनाजी गाढेकर, उपसरपंच काटकर व काँग्रेस कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.