नागपूर – कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि.स.जोग होते. तर कवी अनिल शेंडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आशुतोष अडोणी यांनी यावेळी कादंबरी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. इंडिया बुक आफ रेकॅार्डने सन्मानित पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ ही कादंबरी यापूर्वी ‘जयोस्तुते’ या नावाने हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आली आहे.