सिद्धार्थ महाविद्यालय येथील हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक, विद्यार्थी प्रिय शिक्षक, विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे, तसेच मानव सेवा मंडळाचे राज्य सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी मंडळाचे जाफराबाद तालुक्याची सक्रिय कार्यकर्ते, विविध सामाजिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारे, हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक, अध्यापक शैली प्रकाश वाघमारे यांना, वर्ष हिंदी अध्यापक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने, देण्यात येणारा हिंदी अध्यापक जीवन गौरव पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो यावर्षी मराठवाडा विभागाचा जीवनगौरव पुरस्कार शैली प्रकाश वाघमारे यांना देण्यात आला. त्यापक कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे नुकतेच बारामती येथे अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विविध संघटनात्मक बाबींमध्ये हिरीरीने भाग घेणारे व विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयाचे ज्ञान पोहोचविणारे हिंदी विषय आवर्जून घेणारे विद्यार्थी असे आवडणारे शिक्षक त्यांची ख्याती आहे. ते टेंभुर्णी येथील रहिवाशी असून जाफराबाद तालुक्यांमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून नावाजलेले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेतील ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, दामोदर खडसे हे होते. व उद्घाटक म्हणून आमदार रोहित पवार, पांडुरंग चोरमले, प्राध्यापक सुंदर लोंढे, अध्यापक रेवणात कर्डिले, अध्यापक डॉक्टर मिलिंद कांबळे राज्य अध्यक्ष हिंदी अध्यापक संघ, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये मराठवाडा विभागाचे आदर्श हिंदी अध्यापक जीवनगौरव पुरस्कार त्या पक्षाचे प्रकाश वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. यांच्या बद्दल गौरव उद्गारही काढण्यात आले. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल, भारतीय साने गुरुजी कथामालेचे, जालना जिल्ह्याचे मुख्य मार्गदर्शक आदर्श शिक्षक शेख जमीर सर, नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक, वेध रायगडाचा प्रतिष्ठान, महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ता देशमुख, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे जाफराबाद तालुका सचिव दिनकर ससाने, तालुका अध्यक्ष संजय निकम, सुहास सदावर्ते, राजेश जोशी, सुनील अंभोरे, दिनकर उखर्डे, धनंजय मुळे, दीपक मुळे, गणेश सावसक्के,नंदकुमार काळे, दिव्यांग कवी आकाश देशमुख, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जाफराबाद तालुका अध्यक्षशेख आसपाक, तालुका सचिव बालाजी शेवाळे, तालुका उपाध्यक्ष गजानन शेळके, सिद्धार्थ महाविद्यालयाचे रमेश देशमुख, वाहेद पटेल, रावसाहेब अंभोरे, संजय राऊत, गोविंद जाधव, अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.