जालना । प्रतिनिधी – नागपूर येथे लॉयन्स इंटरनॅशनल मल्टिपल 3234 च्यावतीने आयोजित बहुप्रांतीय अधिवेशनात जालना येथील लॉ. राजेश लुनिया यांना लॉयन्सच्या निस्वार्थ सेवा कार्याबद्दल अतिसक्रिय अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
लॉयन्सच्यावतीने जगभरात नेत्रशस्त्रक्रिया, मधुमेह, लहान मुलांमधील कॅन्सर यावर व्यापक प्रमाणात सेवा कार्य केले जात आहे. तसेच भुकेलेल्यांना अन्न या संकल्पनेअंतर्गत अन्नछत्र चालविले जात आहे. या सर्व उपक्रमात लॉ. राजेश लुनिया यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बहुप्रांतीय अधिवेशनात अतिसकीय लॉयन्स अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बहुप्रांतीय अध्यक्ष लॉ. दिलीप मोदी, प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया, आंतरराष्ट्रीय माजी संचालक लॉ. नवल मालू, गॅट समन्वयक लॉ. अतुल लढ्ढा, प्रांतीय सचिव लॉ. अरुण मित्तल, प्रांतीय कोषाध्यक्ष लॉ. राजेश कामड, प्रांतीय संचालक लॉ. कमल बगडिया आदी लॉयन्स पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सदस्यांची उपस्थिती होती. या अवॉर्डमुळे ऊर्जा मिळाली असून, यापुढेही अधिक जोमाने काम करू, अशी प्रतिक्रिया लॉ. राजेश अवार्ड स्वीकारताना दिली.