केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्न करणार – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर
हरभरा, तुर भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना हमीभावामध्ये माल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देणार- आमदार लोणीकर
शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून काम करा – राहुल लोणीकर
आष्टी | प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे माध्यम असून आष्टी बाजार समितीला विकसित करण्यासाठी आपण संपूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार च्या सभापती उपसभापती निवडी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आम्ही शेतकरी व्यापारी हमाल मापाडी यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहोत
पुढे ते म्हणाले की ,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला सामोरे गेलो या निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला असून मतदारांनी टाकलेला विश्वास पाहता येणाऱ्या काळात बाजार समितीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यावर आपला भर राहणार आहे.
आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरड धान्य खरेदी करण्यासाठी नवीन केंद्रे सुरू करण्यावर आपला भर राहणार असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
यावेळी माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती,उपसभापती, संचालक मंडळाचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती परतुरचे सभापती राहुल लोणीकर म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन करून कृषी उत्पन्न बाजार समितीचा आर्थिक विकास करण्यासाठी नवनिर्वाचित सभापती शत्रुघ्न् कणसे उपसभापती रवी सोळंके यांनी संचालक मंडळाला विश्वासात घेऊन प्रयत्न करावा असे या वेळी बोलताना सांगितले माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून बाजार समितीच्या विकासासाठी भरघोस निधी निश्चित पणाने प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून नवनिर्वाचित सभापती उपसभापतीचे आपण हार्दिक अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले
आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या सभापतींची निवड करण्यासाठी गुरुवार दि.२६ मे रोजी सभा पार पडली. या सभेमध्ये सर्वानुमते सभापती पदी म्हणून शत्रुघ्न कणसे यांची तर उपसभापती म्हणून रवी सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या श्रीराम शेतकरी विकास पॅनल ने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलला चारी मुंड्या चित केले होते
सभापती व उपसभापती निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी कार्यालयात आज विशेष सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान सभापती पदासाठी शत्रुघ्न कणसे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता.
तर उपसभापती पदासाठी रवी सोळंके यांचा एकमेव अर्ज आल्याने य बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले
सभापती उपसभापतींनी मांनले आमदार लोणीकर यांच्यासह संचालक मंडळ सदस्यांचे आभार*
निवडीनंतर सभापती कणसे व उपसभापती सोळंके यांनी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह साचालक मंडळातील रमेशराव भापकर, रामप्रसाद थोरात, अशोकराव बरकुले, विनायकराव लहाने, सिद्धेश्वर सोळंके तुकाराम सोळंके,मुरलीधर केकान ,संपत टकले, बालाप्रसाद सारडा, कृष्णा टेकाळे, सिताराम राठोड योगेश मोरे, भागवत कडपे, प्रभाकर खंदारे, उद्धव गुंजाळ सखाराम इंगळे आदींचे आभार व्यक्त केले
याप्रसंगी परतुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजी वारे, रंगनाथ येवले, पंचायत समिती सदस्य अर्जुन राठोड प्रदीप ढवळे पंचायत समितीचे माजी उपसभापती सूरेश सोळंके, राजेंद्र बाहिती मुरली भाऊ राठोड गजानन लोणीकर माऊली सोळंके बाबू राठोड बबलू सातपुते मधुकर मोरे, अमोल जोशी बाबाराव थोरात , महादेवराव वाघमारे, रासवे सर दादाभाऊ तोर वसंत बेरगुडे बाळासाहेब लहाने, श्री गांजाळे, प्रफुल्ल शिंदे, नामदेव व्यवहारे, अनिल व्यवहारे, दत्ता रायकर गणेश राठोड, भागवत जगताप, मारुती थोरात छत्रपती थोरात, शिवशक्ती आढाव, रमेश बडवणे, गणेश राव चव्हाल, उमेश सोळंके, अंबादास काटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती