परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राहूल लोणीकर तर उपसभापतीपदी संभाजी वारे यांची बिनविरोध निवड

46
सर्वांना सोबत घेऊन बाजार समिती सुजलाम सुफलाम करणार – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर
शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – राहुल लोणीकर
राहुल लोणीकर यांनी स्वीकारला बाजार समिती सभापती पदाचा कार्यभार सर्व संचालकांसह शेतकरी बांधवांचे मानले आभार
परतूर | प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात आली असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन बाजार समिती सभा लावून करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले ते परतुर येथील कृषी उत्पन्न बाजार च्या सभापती उपसभापती निवडी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते
यावेळी आमदार लोणीकर पुढे बोलताना म्हणाले की आम्ही सर्वांना सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला सामोरे गेलो या निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला असून मतदारांनी टाकलेला विश्वास पाहता येणाऱ्या काळात बाजार समितीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यावर आपला भर राहणार आहे.
यावेळी माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
नवनिर्वाचित सभापती,उपसभापती, संचालक मंडळाचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सभापती राहुल लोणीकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन करून कृषी उत्पन्न बाजार समितीचा आर्थिक विकास करण्यावर आपला भर राहील कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व दृष्टीने सक्षम बनविण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असून माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून बाजार समितीच्या विकासासाठी भरघोस निधी उभा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल
परतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या‎ सभापतींची निवड करण्यासाठी गुरुवार दि.‎२५ मे रोजी सभा पार पडली. या‎ सभेमध्ये सर्वानुमते सभापती पदी म्हणून भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची तर उपसभापती म्हणून संभाजी वारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार‎ समितीत सुरू असलेल्या राजकीय‎ उलथापालथीला आता पूर्णविराम मिळाला‎ आहे.‎
संचालक मंडळ निवडीसाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक घ्यावी लागली होती.
सभापती व उपसभापती निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती परतुर कार्यालयात आज विशेष सभा घेण्यात‎ आली. या सभेदरम्यान सभापती पदासाठी‎ राहुल लोणीकर यांचा एकमेव अर्ज दाखल‎ करण्यात आला होता.
तर उपसभापती पदासाठी संभाजी वारे यांचा एकमेव अर्ज आल्याने श्री राहुल लोणीकर व श्री संभाजी वारे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले
राहुल लोणीकर यांनी स्वीकारला बाजार समिती सभापती पदाचा कार्यभार सर्व संचालकांसह शेतकरी बांधवांचे मानले आभार
परतुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री राहुल लोणीकर यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार स्वीकारला असून याप्रसंगी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर, नवनिर्वाचित उपसभापती संभाजी वारे हे देखील उपस्थित होते. यावेळी राहुल लोणीकर यांनी नवनिर्वाचित संचालक सर्वश्री हरीराम माने दिनेश होलानी शहाजी राक्षे लक्ष्मण टेकाळे पाराजी मुळे दिपाली बोणगे बालासाहेब आकात मेराजोद्दीन खतीब आप्पासाहेब खोसे मदन हजारे पद्माकर कवडे गुलाबराव अवचार सत्यनारायण अग्रवाल विजय वाणी कविता आंबेकर भुजंगराव धुमाळ यांच्यासह शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले
याप्रसंगी प्रदीप लढ्ढा, भगवानराव मोरे गणेशराव खवणे रमेश भापकर सतीशराव निर्वळ प्रकाश टकले हरिराम माने, रामप्रसाद थोरात शहाजी राक्षे,दिगांबर मुजमुले, राजेश मोरे नागेश घारे गणपतराव वारे लक्ष्मणराव पवार दया महाराज काटे पंजाबराव बोराडे, रंगनाथ येवले अशोकराव बरकुले, डॉ सुखराज कोटेचा गोविंद मोर नेमीचंद कोटेचा शत्रुघ्न कणसे,रवी सोळंके,संदीप बाहेकर, प्रशांत बोनगे प्रवीण सातोनकर,ओम मोर,प्रकाश चव्हाण, सोनू अग्रवाल, नरेश कांबळे मुज्जू कायमखनी,मलिक कुरेशी कवडे संपत टकले,तुकाराम सोळंके,सिद्धेश्वर सोळंके,मधुकर मोरे शिवाजी पाईकराव,भगवान आरडे विठ्ठल बिडवे नारायण बिडवे गजानन लिपणे ज्ञानेश्वर सोळंके,नितीन राजेभाऊ खराबे वसंत भापकर,नदीम पटेल,सुधाकर बेरगुडे,गजानन लोणीकर राजू दादा वायाळ जगदीश पडुळकर विलास घोडके ज्ञानेश्वर गोंडगे कैलास चव्हाण शिवाजीराव थोरवे बंडू मानवतकर बबलू सातपुते सतीश कुलकर्णी च्यासह अनेकांची उपस्थिती होती.