तालुक्यात शासनाच्या 108 रुग्णवाहिका सेवेचा खोळंबा

21
जाफराबाद | प्रतिनिधी – आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयापर्यंत लवकर पोहोचता यावे म्हणून शासनाने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.पण जाफराबाद तालुक्यात या सुविधेचा खोळंबा झाला असून रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून यामुळे एखाद्या रुग्णांचा प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे संबंधित विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून तालुक्यातील ही सेवा प्रभावीपणे  सुरू करण्याची मागणी होत आहे.अत्यस्थ रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने 26 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस अंतर्गत 108 ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली गेली असून,झटका, अपघात ,भोवळ,अर्धांगवायू,विषबाधा, आगीत भाजणे अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असून यामुळे सुरवातीला ही सेवा सुरळीतपणे सुरू होती.
मात्र स्थानिक अधिकारी ,व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे व कामचुकार धोरणामुळे या सेवेला जाफराबाद तालुक्यात हरताळ बसली आहे.त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान या रुग्णवाहिकेत अत्यावश्यक साठी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.मात्र कधी डॉक्टर गैरहजर, तर कधी रुग्णवाहिका खराब  असल्याने शेजारील रुग्णालयातुन रुग्णवाहिकेची मागणी करावी लागत आहे.परंतु जवळील रुग्णालयाच्या रुग्णवाहिका कोणत्या अन कोणत्या कारणामुळे रुग्णापर्यत पोहोचवण्यासाठी विलंब घेत आहे.त्यामुळे तासंतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.यामुळे रुग्णांवर व नातेवाईक यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे.
जाफराबाद तालुक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्ताराले असल्याने रस्त्याची ही परिस्थिती भयावह आहे.रात्री अपरात्री अपघात घडण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा परिस्थितीत आपघाग्रस्त लोकांना 108 या रुग्णसेवेचा लाभ मिळण्यास विलंब होतो. हा विलंब कशाने होतो याकडे आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. लोकप्रतिनिधी या नात्याने आरोग्यमंत्री यांना हा प्रकार सांगितला जाणार असून ही सेवा प्रभावीपणे पुर्वरत व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
रामकृष्ण पाटील बनकर
नेते राष्ट्रवादी काँग्रेस जाफराबाद