जालना – विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांच्या वतीने 15 मे ते 20 मे पर्यंत विशेष अभियाना अंतर्गत कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
महामार्ग पोलीस केंद्रातर्फे सहा. पो.निरि. अभय दंडगव्हाळ यांच्या वतीने जालना जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात आले की, वाहनधारकांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे.
महामार्ग पोलीसांच्या वतीने विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून 1843 वाहनधारकांवर 6 लाख 52 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. महामार्गावर अपघात होऊन मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी जालना महामार्ग पोलिसांच्या वतीने 15 ते 20 मे दरम्यान विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर मोटर वाहन कायदा 129 नुसार कारवाई करण्यात आली.
विना हेल्मेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सोबतच हेल्मेट विषयी जनजागृती सुध्दा करण्यात आली.
सदरील कारवाई औरंगाबाद परिक्षेत्राचे महामार्ग पोलीस अधीक्षक श्रीमती अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक दीपक टीपारसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. निरीक्षक अभय दंडगव्हाळ,अमोल जाधव, पिएसआय. साखरे, एएसआय जाधव,एएसआय. मुंडे, एएसआय,मोमिन, हेड कॉ.विजय आढाव, हेड कॉ. बागर,हेड काॕ. बाबर, पो.कॉ.राठोड, पो. कॉ. वसंत राठोड पो. कॉ.गोल्डे, पो.कॉ. ठोंबरे, पो. कॉ. गंभीर पाटील, पो.कॉ. माऊली खराडे, पो.कॉ. बेडेकर, पो.कॉ.उगले, तसेच महिला पो.कॉ. शितल लोखंडे यांच्या वतीने करण्यात आली आहे..