जालना – सेवली तालुक्यातील अंभोरा जहागिर येथील उकाड्यामुळे घराबाहेर अंगणात झोपलेले असतांना
अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे दागिने व
घरातील रोख ५७ हजार रुपये असा १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल लंपास
केल्याची घटना जालना तालुक्यातील अंभोरा जहागिर गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सेवली पोलीस ठाण्यात अंभोरा जहागिर येथील माऊली किसनराव वाहेकर यांच्या तक्रारी नुसार २२ मे रोजी रात्री ११ ते २३ मे रोजीच्या पहाटे २
वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने रात्रीच्या वेळी माऊली वाहेकर v त्यांची पत्नी हे कुटुंबसह अंगणात झोपले असतांना त्यांच्या पत्नीचे गळ्यातील अंदाजे
६० हजार रुपये किमतीचे दागिने व घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एकुण ५७ हजार रुपये
रोख रक्कम असे एकुण १ लाख १७ हजार ५०० रुपये अज्ञात चोरटयाने चोरुन नेले
आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कलम ३७९, ३८०,४५७ भादवी प्रमाणे सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.ना पवार
हे करीत आहेत.