आन्वा फाट्याजवळ बस-दुचाकीची समोरसमोर धडक, दुचाकीस्वार ठार

53
भोकरदन- मेव्हण्याच्या तेरवीचा कार्यक्रम आटपून परत घरी येत असतांना आन्वा फाट्याजवळील शरद ट्रॅक्टर शोरुमसमोर बस-दुचाकीची समोरसमोर धडकेत युवक ठार झाला. हा अपघात ईतका भयंकर होता की,युवक जागीच ठार झाला.
 दिलीप शेनफड बावस्कर (वय ३२ रा.देहेड ता.भोकरदन जि.जालना) ठार झालेल्या युवकांचे नाव आहे.
देहेड येथील दिलीप शेनफड बावस्कर हे मंगळवारी (दि.२३) रोजी भोकरदन तालुक्यातील विटा (रामनगर) येथे मेव्हण्याचा तेरवीचा कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री विटा येथे मुक्कामी राहले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.२४) सकाळीच महत्वाचे काम असल्याने दिलीप बावस्कर हे एकटेच आपल्या गावाकडे देहेड येथे जात असतांना भोकरदनजवळील आन्वा फाट्याजवळील शरद ट्रॅक्टर शोरूमसमोर दुचाकी क्र. एमएच.२१ ए.झेड ९३६२ आणि  बस क्र. एम.एच ४० एक्यु ६४४७ मलकापूर -पुणे समोरासमोर धडक झाली. बसच्या जोराच्या धडकेत युवक दिलीप बावस्कर हा जागीच ठार झाला होता. यानंतर दुचाकी चालकास भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवविच्छेदन करून देहेड येथे  २ वाजता शोकाकुल वातावरणात पार्थिवदेहावर अत्यंसंस्कार  करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, तीन मुली, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.