गीरोली खुर्द खेडेगावातील गंगाई ग्रंथालय ठरतेय ज्ञानभंडार ; एएसपी अनिल म्हस्के यांचा अनोखा उपक्रम

125
टेंभुर्णी | प्रतिनिधी – ग्रामीण भागातील असंख्य गुणवंत विध्यार्थी बिकट परिस्थितीमुळे यूपीएससी, व एमपीएससीची तयारी करू शकत नाही.आगोदर नैसर्गिक संकटाने हतबल झालेले शेतकरी उदरनिर्वाहसाठी मोलमजुरी करत असतांना चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळते. अशा भयावह परिस्थिती एव्हडे महागडे पुस्तक कशी खरेदी करणार ?असा प्रश्न पालकांसमोर उभा असतो.हिच बाब लक्षात घेता माझ्या परिसरातील एकही मुलगा अभ्यासात मागे पडू नये,त्यांनी स्वप्ने उराशी बाळगून उच्चस्पद अधिकारी व्हावे उद्देशाने गीरोली गावाचे भूमिपुत्र अनिल म्हस्के यांनी त्यांच्या गावातील निवासस्थानी गंगाई नावाने खुले ग्रंथालय सुरू केले आहे.या ज्ञानाच्या खजिन्यातुन सुमारे 80 च्या वरती मुले अधिकारी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत.
सामान्य कुटूंबात जन्मलेले अनिल म्हस्के यांनी जिद्द ,चिकाटी ,आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर यूपीएससी मध्ये गीरोली खुर्द या गावाचा डंका देशभर गाजवला.यूपीएससी मध्ये 361 वि रँक घेत आयपीएस झाले.सर्व प्रकियेतून गेल्यानंतर त्यांना सध्या नागपूर ग्रामीणमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षकपदावर आपले कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळाली आहे.
आपण अभ्यासात घेतलेले कठोर परिश्रम ,आपल्याला आलेल्या अडचणी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना पडू नये ,म्हणून त्यांनी आपल्या मूळ गावी गंगाई नावाचे खुले ग्रंथालय सुरू करून या ठिकाणाहून मुलांना अभ्यासातील सर्व सुख सोयी निशुल्क पणे पुरविल्या जात आहे.
गीरोली खुर्द या पंचक्रोशीतील जवळपास 80 विध्यार्थी ज्ञान आत्मसात करत आहे.त्याचबरोबर गावांतील इतरांना व मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या वाचनालयात,आत्मचरित्र, दलित साहित्य,कथा, कादंबरी,कविता, निसर्गावर आधारित साहित्य,इतिहास, व एमपीएससी साठी मार्गदर्शक साहित्य,प्रेरणादायी साहित्य,प्रेमचंद यांचे हिंदीतील साहित्य,संविधानावरील व विज्ञानाबद्दल गोडी लावणाऱ्या पुस्तकापासून ते लहान मुलांना आवडतील असे पंचतंत्र सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
वाचनाची आवड लागावी व विविध विचारांची जाणीव होऊन ज्ञानाचा व्यासंग वाढवा हा या मागील खरा उद्देश असल्याचे श्री म्हस्के यांनी सांगितले.
आजच्या परिस्थिती योग्य मार्गदर्शनाअभावी युवा पिढी व्यसनाधीन होऊन चुकीच्या मार्गाने जात आहे.हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी ज्ञानदान हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे.
गंगाई च्या दालनात 500 पुस्तके
या ग्रंथालयात श्री म्हस्के यांना यूपीएससी साठी उपयुक्त ठरलेली व त्याना आवड असलेल्या अवांतर वाचनाची सुमारे 500 पुस्तकाचा खजिना त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.विशेष म्हणजे गावातील सर्वांना वर्तमान पत्रे, मासिके, साप्ताहिक उपलब्ध करून दिली जाते आहे.
विविध क्षेत्रात पाय रुजवा
आजच्या तरुण पिढीसमोर पोलीस भरती, सैन्य भरती इतकाच पर्याय समोर असतो.परंतु असे अनेक क्षेत्र आहे की त्या ठिकाणी आपल्या आत्मविश्वासा वर आपण पाय रोवु शकत असल्याचे श्री म्हस्के यांनी यावेळी सांगितले.