आंबेगाव च्या सरपंचपदी जया देठे यांची निवड

43
टेंभुर्णी | प्रतिनिधी – आंबेगाव ता जाफराबाद ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ जया मधुकर देठे यांची सोमवारी ता 22 बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच मनोज शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने आज सोमवारी सरपंच निवडीसाठी ग्रामसंसद कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी सौ देठे यांचाच एकमेव अर्ज आल्याने सदर पदावर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सौ देठे यांनी यापूर्वी 5 वर्ष सरपंच पद भूषविले असून 5 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका म्हणून ही काम केलेले आहे.सोमवारी आयोजित विशेष सभेत मावळते सरपंच मनोज शिंदे, बालाजी विश्वनाथ देठे, लिलाबाई पंढरीनाथ कराळे,लिलाबाई अशोक चिडे,कमलबाई अशोक डहाके,सत्यभामाबाई रमेश शिंदे, किरण दत्ता कराळे, भाऊराव शंकर गोफनणे यांची उपस्थिती होती.अध्यासी अधिकारी म्हणून यांनी काम पाहीले. त्यांना ग्रामसेवक यांनी सहकार्य केले.