तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर घुंगर्डे हादगाव येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मागे

21
जालना- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील आज दि. 24 बुधवार रोजी ग्रामस्थांचे सुरु असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी पत्र मिळाल्यावर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते उपोषण कर्त्यानी लिंबू पाणी पिवून आमरण उपोषण सोडन्यात आले.
     रखडलेले अतिवृष्टी अनुदान वाटप आज पासुन वाटपास सुरुवात करण्यात आली.अंबिया बहराचा मंजूर फळपीक विमा १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल,तलाठ्याने प्रलंबित ठेवलेले शेत जमिनीचे शेकडो फेर तात्काळ निकाली काढण्यात येतील, ज्या शेतक-यांचे शेत रस्त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत. त्यांच्या अर्जानुसार स्थळपाहाणीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.तसेच खरीप व रब्बी पिकांच्या पेरणी पूर्वी एकरी दहा दहा हजार रूपये अनुदान देण्याची राज्य सरकारला विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केलेली शिफारस शासनाने मंजुर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे लेखी आश्वासन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी उपोषण कर्त्याना दिले.
   भाऊसाहेब मस्के, बप्पासाहेब मस्के, महादेव गाजरे,बंडू  शिंगटे, ज्योतीराम घाडगे, प्रमेश्वर शिंगटे,रघुनाथ चौरमले, भीमराव थोरात,सोमनाथ तळतकर,शिवाजी मस्के,आनंदराव तळतकर,कांता शिंदे,मानसिंग रामसिंग पवार,प्रदिप जोशी आदी ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके व माजी सभापती सतीश होंडे यांच्या हस्ते लिंबू पाणी पीवून उपोषण सोडले.
       यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पंडित दादा भुतेकर, राष्ट्रवादी चे नेते मनोज मरकड, शिवाजी मस्के,माजी सभापती सतीश होंडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,जिप सदस्य डॉ गणेश पवार, आदींनी उपोषण स्थळी भेटी दिल्या.
   यावेळी सरपंच भरत काळे, सचिन चोरमले,किसनसिंग पवार, महादेव गाजरे, नारायण अडाणी, रतनसिंग कचोर, रमेश ढाले, संतोष धावडे यांच्यासह घुंगर्डे हादगाव येथील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.