आनंदवाडी ग्रामपंचायतीचा महिला सरपंचाच्या हक्कांवर गदा ;  सरपंच महिलेचा पती सांभाळतो सरपंच पदाचा कारभार

72
परतुर | प्रतिनिधी – परतुर तालुक्यातील आनंदवाडी येथील तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावाचा कारभार आरक्षणानुसार महिला सरपंच यांच्या हाती असून च्यार ते पाच महिन्यांमध्ये गावामध्ये एक ही ग्रामसभा आतापर्यंत घेतलेली नाही. निवडणूक झाल्यापासून महिला सरपंच ग्रामपंचायतमध्ये फक्त एक वेळस पाऊल ठेवला आहे. ग्रामपंचायतचा पूर्ण कारभार त्यांच्या पतीच्या हाती असल्यामुळे सरपंच पदाचा दुरुपयोग होत आहे .
गावातील नागरिक कुठले काम घेऊन गेल्यास ग्रामविकास अधिकारी व सरपंच महिलेचे पती कामाविषयी कायद्याच्या शिकवून कर्तव्यापासून आपला हात काढून घेण्याचे काम करत आहेत. यामुळे गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे तीन ते चार महिन्यांनी कुठलीही प्रत्येक्षात ग्रामसभा न घेता कागदपत्रे सभेचा उल्लेख दिसून येत आहे. गावातील नागरिकांना ग्रामसभेची कुठलीही माहिती न देता कार्यालयामध्ये बसून दोन ते तीन सदस्य आपली स्वतःची मनमानी करून, ग्रामसभेच्या कागदावर खोटे नाट्य सह्या करून ग्रामसभा भरले असे दाखवून देत आहेत.
चार ते पाच महिन्यात आनंदवाडी ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठा स्वच्छता व इतर कुठल्याही कामांमध्ये सरपंच व ग्रामसेवक लक्ष घालत नाहीत.
कामाबद्दल विचारपूस केले असता अरेरावीची भाषा करून नागरिकांना दाबण्याची  भूमिका ग्रामसेवक मुरदकर व सरपंच महिलेचा पती वसंत भापकर हे करत आहेत.
 स्वतःची दांडकशाही समजून आनंदवाडी गावातील नागरिकांची दिशाभूल होत असल्यामुळे परतुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून आनंदवाडी ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवकांना त्यांचे कर्तव्य काय आहे ते दाखवून देण्यात यावे अशी गावातील नागरिका मधून मागणी होत आहे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर गावातील नागरिक आमरण उपोषण करणार असा इशारा गावातील सुजणे नागरिकांतून  देण्यात आला आहे,
आनंदवाडी येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मुरदकर यांना विचारले असता  तीन ते चार महिन्यात आपण किती ग्रामसभा घेतल्या  ते म्हणाले शासनाच्या नियमानुसार 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी आम्हाला ग्रामसभा मीटिंग घेण्याचा अधिकार आहे इतर वेळी मीटिंग घ्यायच्या किंवा नाही  ते आम्ही बघू असे म्हणून मनमानी कारभार चालू असल्याचा प्रत्येय आला.
जशी आमची पदावर नियुक्ती झाली तशी गावमध्ये एक ग्रामसभा भरलेली नाही दोन-तीन सदस्यांना ग्रामपंचायत मध्ये बोलवतात व गावातील इतर कुठल्याही नागरिकांना न बोलावता परस्पर ग्रामसभेच्या रजिस्टर वर सह्या घेऊन ग्रामसभा झाली असे दाखवून दिले जाते.
– अभय काळूके
गावातील नागरिकांच्या समस्या बद्दल सरपंच व ग्रामसेवक यांना विचारपूस केले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढूपणा करीत आहेत
-रवी जनार्दन भापकर