जालना | प्रतिनिधी – 30 मे 2023 रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव मा.नरेद्र मोदीजी यांच्या नेतृत्वखालील सरकारला 9 वर्ष पुर्ण होत आहेत या निमित्त 30 मे ते 30 जुन 2023 या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्रात भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे व उप मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व जालना जिल्हा व जालना लोकसभेत ना.रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार यांच्या नेतृत्वाखाली “विशेष जनसंपर्क अभियान” व त्या अंतर्गत् विविध कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.
आज दिनांक 23 मे 2023 रोजी भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा कार्यकारिणीची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली कलश सिडस् सभागृह,मंठा चौफुली,जालना येथे घेण्यात आली.
“पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जीच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत असून भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे. देशातील पायाभूत सुविधा विकासाचे जाळे अधिक मजबूत करुन आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. या अभियानाचा उपयोग घेऊन लोकसभा व विधानसभा मतदारसंघात बुथ स्तरावर व्यापक जनसंपर्क,लाभार्थी संपर्क,समाजातील विविध घटकांशी संपर्क,जेष्ठ कार्यकर्त्याशी संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळया कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली जाणे अपेक्षीत आहे” असे ना.रावसाहेब पाटील दानवे जिल्हा बैठकीत पदाधिकाऱ्याच्या समोर बोलतांना म्हणाले.
यावेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी संपर्क से समर्थन,पत्रकार परिषदा,बुध्दीवंताचे संमेलन,सोशल मिडीयांचा प्रभावी वापर,मोदी सरकारच्या काळात देशभरात,जालना जिल्हयात व महाराष्ट्रातील भाजपा सरकारच्या काळात झालेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे,जेष्ठ भाजपा कार्यकर्त्यांन सोबत संवाद व स्नेह भोजन,सरकारच्या लाभार्थ्यांचे संमेलन, दि.21 जुन योग दिन या कार्यक्रमांचा उपयोग घेत जिल्हयातील प्रत्येक घरापर्यंत जात संपर्क साधून भाजपाला जनसंमर्थन मिळविले पाहिजे.
यावेळी बोलतांना आ.नारायण कुचे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीतीची चर्चा करत भाजपा सरकारच्या भक्कम बाजू शेतकरी हिताचे निर्णय जनते पर्यंत सांगितले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना जालना जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष एजाज देशमुख यांनी जालना जिल्हा हा भाजपाचा बाले किल्ला असून पुढील महिनाभराच्या या अभियानात प्रदेश पदाधिकारी ते बुथ वरील सामान्य कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना केंद्राचा व राज्याचा कृषीप्रधान व शेतकरी हिताचा अर्थसंकल्प व विविध योजना जनतेपर्यंत समजावून सांगत जनसंमर्थन मिळवावे असे म्हणाले.
मा.जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांनी राज्याला “विकासपथावर साथ देऊ वैभवशाली महाराष्ट्र घडवू” या नितीने काम करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला संमर्थन देणाऱ्या राजकीय ठरावाचे वाचन केले व उपस्थीत पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून अनुमोदन दिले. मा.देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शाश्वत शेती- समृध्द शेतकरी,महिला आदिवासी-मागसवर्ग-ओबीसीसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास,भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास,रोजगार निर्मित-कुशल रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपुरक विकास ही पाच उद्दीष्टे साध्य करण्यासाठी या अर्थसंकल्पात विविध उपाययोजना केल्या आहेत असे भास्करराव पाटील दानवे म्हणाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे,आ.नारायण कुचे,माजी आ.विलासबापू खरात, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जेष्ठ कार्यकर्ते भिमराव डोंगरे, समृध्दी शुगर व घृष्णेश्वर शुगर चेअरमण सतिषजी घाडगे, प्रदेश कार्य समिती सदस्य,रामेश्वर पाटील भांदरगे,बद्रीनाथ पठाडे, सुनिल आर्दड,प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस अतिक खान, भाजपा प्रदेश निमंत्रीत सदस्य सौ.संध्याताई देठे, जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, अनिलराव कोलते, अवधुत खडके, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सतिष जाधव, बाबुराव मामा खरात,वसंतराव जगताप, सुहास मुंढे,देविदास देशमुख, भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, वसंतराव शिंदे, राजेंद्र देशमुख, जितेंद्र पालकर,भिमराव भुंजग, विजय कामड,अर्जुन गेही,माजी जि.प.अध्यक्ष तुकाराम जाधव, सर्जेराव जाधव,डॉ.गोविंद भताने, स्वप्नील मंत्री,माजी सभापती राजेश चव्हाण, द्वाकराबाई मेहत्रे,प्रदेश वैद्यकिय संयोजक डॉ.अमोल कारंजेकर,सुधाकर खरात डॉ.तुकाराम कळकुंबे, गणेश इंगळे,भगवान रावळकर,सोपान पेंढारकर,मराठवाडा युवती प्रमुख शमिष्ठा कुलकर्णी,गोविंदराव पंडीत,शशीकांत घुगे,सौ.शुभांगीताई देशपांडे,देविदास कुचे,दिलीप अर्जुने सर,साहेबराव कानडजे,दगडूबा गोरे,अरुण उपाध्ये, चंपालाल भगत,रावसाहेब भवर,संतोष लोखंडे,शिवराज जाधव, भगवान मात्रे, हरीश्चंद्र शिंदे, सय्यद ईम्रान,साईनाथ उकर्डे, विठ्ठल चिंचपुरे,अमोल धानुरे,नामदेव तिडके, कैलास उबाळे, अनिल सरकटे, संजय डोंगरे, रवि आग्रवाल,राजु गवई, सकुबाई पनबिसरे,सतिषचंद्र प्रभु,रहेमान शेख, शारदा काळे, इमाम शेख,जुनेद मिर्झा, जगदिश नदीम कुरेशी, येनगुपटला,रमेश तारगे, डॉ.रमेश शाहणे, राजे जाधव,नामदेव ढाकणे,राजु साळवे,गोविंद ढेंबरे,उध्दव दुनगहू,गजानन तांदुळजे,विकास कदम, आदीसह 300 पैक्षा जास्त पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.