जालना | प्रतिनिधी- भारत राष्ट्र समिती जालनाच्या वतीने छत्रपती शिवाजी पुतळा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन एक नवीन क्रांती घडवण्याच्या उद्देशाने व शेतकर्यांना शेतकर्यांचा न्याय हक्क मिळून देण्यासाठी गाव तिथे व शहरातील प्रत्येक वार्डात दहा प्रकारच्या शाखा स्थापन मोहीमेची आज २२ मे रोजीपासून सुरुवात केली आहे. या मोहिमेला जालना शहरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. येणार्या ३० दिवस प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये एक स्पीकर सहित गाडी फिरवून तेलंगणा मॉडलबद्दल माहिती देऊन पॉम्पलेट स्टिकर झेंडे गावागावांमध्ये पाठवणार आहे. जेणेकरून येणारे सरकार शेतकर्यांच्या हिताचे असेल. यामुळे शेतकर्यांनी व नागरिकांनी आपकी बार किसान सरकार हा नारा देवून मोहीमेत सहभागी व्हावे. सुरुवात करण्यात आली असल्याचे जिल्हाप्रमुख प्रवीण पाटील- फुके यावेळी वेळी सांगितले. यावेळी विधानसभा जालना विधानसभा समन्वयक अशोक अंभोरे, बदनापूर विधानसभा समन्वयक राजू उर्फ लक्ष्मण वायाळ, शिवाजी इंगळे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब कदम, बबनराव गवारे, कडूबा देशमुख, पंडित सोनवणे, सतीश ढवळे, सौरभ मस्के, गजानन उगले, आदित्य अंभोरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.