जलीकट्टूच्या धर्तीवर रेड्याच्या टक्करीलाही परवानगी द्यावी – दुर्गेश काठोठीवाले

81

जालना | प्रतिनिधी – राज्यातील पारंपारिक बेलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने नूकतीच मान्यता दिली आहे. या निर्णयाचे नक्कीच स्वागत आहे. मात्र तामिळनाडू राज्यातील जलीकट्टू या पारंपरिक खेळाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील रेड्यांच्या पारंपारिक टक्करीच्या स्पर्धेलाही सुद्धा शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांनी केली आहे. बैल हे धावण्यात तरबेज असल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला तसेच यामूळे कोणतीही ईजा अथवा जिवितहानी होत नसल्याने बेलगाडा शर्यतीला मान्यता देण्यात आली. यामूळे याच धर्तीवर राज्यातील पारंपारिक खेळ किंवा स्पर्धा समजली जाणारी रेड्यांच्या टक्करीलाही मान्यता देण्याची गरज दुर्गेश काठोठीवाले यांनी व्यक्त केली आहे. यामध्येही रेड्यांना ईजा किंवा जिवितहानी होण्याच्या घटना फार नाहीत. रेड्यांच्या पालन-पोषणावर मोठा आर्थिक खर्च करण्यात येत असतो. तो अशा स्पर्धेच्या माध्यमातून निघतो. अन्यथा अनेक रेडे कत्तलखान्यात जातील अशी भितीही काठोठीवाले यांनी व्यक्त केली आहे. या खेळात रेड्यांच्या जीविताला हानी पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येते आणी त्यामुळे यावर बंदी घातलेली आहे. हे काही प्रमाणात सत्य असले तरी कोणताही मैदानी खेळ असोत त्यात जीवितवाची हानी पोहचण्याची शक्यता असतेच. परंतु केवळ काही अपवादात्मक घटनाच्या आधार घेऊन रेड्यांच्या टक्करीला बंदी घालणे पशु पालकांच्या आर्थिक दृष्टीने योग्य नसल्याचे म्हणाले. विशेष म्हणजे या बंदीमुळे रेड्यांच्या विशेष प्रजाती नष्ट होण्याची भिती देखील काठोठीवाले यांनी व्यक्त केली आहे.