औरंगाबाद | प्रतिनीधी – फेंटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व फेंटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने दि. 12 ते 14 मे 2023 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा परीसर, औरंगाबाद येथे आयोजीत पहिल्या राष्ट्रीय फें टबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन फेंटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी विशेष उपस्थितीमध्ये औरंगाबादचे क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, संस्थापक सचिव शेख चाँद पी.जे., फेंटबॉलचे राष्ट्रीय निरीक्षक शेख अहेमद हे उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र अ संघ 18 सुवर्ण, 5 रजत व 2 कास्य पदकावर आपले नाव कोरत पहिल्या स्थानावर तर 11 रजत व 4 कास्य पदक प्राप्त करत महाराष्ट्र ब संघाने दुसरा क्रमांक प्राप्त केला, तर मध्यप्रदेश संघ 1 रजत पदक व 3 कास्य पदक प्राप्त करत तिसर्या स्थानावर राहिला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण फेंटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष अक्षय विष्णु पवार, संस्थापक सचिव शेख चाँद पी.जे., फेंटबॉलचे राष्ट्रीय निरीक्षक शेख अहेमद, उपाध्यक्ष मिर्झा ईकबाल, उपाध्यक्ष सौ. रूपाली पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा अंतीम निकाल पुढील प्रमाणे – * सांघीक स्पर्धा ः सब ज्युनीयर मुले – प्रथम महाराष्ट्र अ, द्वितीय महाराष्ट्र ब, ज्युनीयर मुले – प्रथम महाराष्ट्र अ, द्वितीय महाराष्ट्र ब, तृतीय मध्य प्रदेश, ज्युनीयर मुली – प्रथम महाराष्ट्र अ, द्वितीय महाराष्ट्र ब, सिनीयर मुले – प्रथम महाराष्ट्र अ, द्वितीय महाराष्ट्र ब, तृतीय गुजरात, सिनीयर मुली प्रथम महाराष्ट्र अ, द्वितीय महाराष्ट्र ब
* वैयक्तीक स्पर्धा ः सबज्युनीयर मुले – दुहेरी – प्रथम प्रतिक घोंडगे, पीयुष खेडेकर (महाराष्ट्र अ), द्वितीय पारस दिवाळे, जयवर्धन जाधव (महाराष्ट्र ब), तृतीय विवेक झिंजुर्डे, आर्यन चव्हाण (महाराष्ट्र अ), तिहेरी – प्रथम प्रतिक घोंडगे, विवेक झिंजुर्डे, आर्यन चव्हाण (महाराष्ट्र अ), द्वितीय पारस दिवाळे, रूद्र शाहु, जयवर्धन जाधव (महाराष्ट्र ब), ज्युनीयर मुले – दुहेरी – प्रथम अभिजीत गाढेकर, आदित्य वटाने (महाराष्ट्र अ), द्वितीय शिवम बर्डे, विनायक अकोदे (महाराष्ट्र अ), तृतीय विश्वप्रतापसिंग राजपुत, आर्यन जाधव (महाराष्ट्र ब), तिहेरी – प्रथम शेख साबेर, विनायक अकोदे, अभिजीत गाढेकर (महाराष्ट्र अ), द्वितीय ओम अडसुल, श्रावण राठोड, राहुल राठोड (मध्य प्रदेश), तृतीय विश्वप्रतापसिंग राजपुत, आर्यन जाधव, सुमीत सुलसुले (महाराष्ट्र ब), ज्युनीयर मुली – दुहेरी- प्रथम सायली एखंडे, प्रतिक्षा रंजवे (महाराष्ट्र अ), द्वितीय आर्या भिसे (महाराष्ट्र अ), तृतीय आरोही त्रीभुवन, अबोली गायकवाड (महाराष्ट्र ब), तिहेरी – प्रथम आर्या भिसे, सायली एखंडे, प्रतिक्षा रंजवे (महाराष्ट्र अ), द्वितीय आरोही त्रीभुवन, अबोली गायकवाड, अनुष्का गव्हाड (महाराष्ट्र ब), मिश्र दुहेरी – प्रथम रोहीत जाधव (मध्य प्रदेश) सायली एखंडे (महाराष्ट्र अ), द्वितीय – राहुल राठोड (मध्य प्रदेश) पलक साळवे (महाराष्ट्र अ), तृतीय सोमेश आढे (मध्य प्रदेश), आर्या भिसे (महाराष्ट्र अ), मिश्र तिहेरी – प्रथम शेख साबेर, अभिजीत गाढेकर (महाराष्ट्र अ), आर्या भिसे (महाराष्ट्र अ), द्वितीय – आर्यन जाधव, सुमीत सुलसुले (महाराष्ट्र ब) सायली एखंडे (महाराष्ट्र अ), सिनीयर मुले – दुहेरी – प्रथम शेख समीर, सोहेल खान (महाराष्ट्र अ), द्वितीय पवन पवार, यशोवर्धन जाधव (महाराष्ट्र ब), तृतीय शिवप्रसाद बारगजे, महाविर राठोड (मध्य प्रदेश), तिहेरी – प्रथम शेख समीर, सोहेल खान, प्रकाश सिंग (महाराष्ट्र अ), द्वितीय ओम सोनवणे, यशोवर्धन जाधव, अनुजसिंग राजपुत (महाराष्ट्र ब), तृतीय शिवप्रसाद बारगजे, तेजस मगरे, यश बोर्डे (मध्य प्रदेश), सिनयर मुली – दुहेरी – प्रथम शितल लिहीणार, नम्रता चौधरी (महाराष्ट्र अ), द्वितीय प्रज्ञा बोर्डे, पुजा कांबळे (महाराष्ट्र अ), तृतीय यशांजली गव्हाड, राधा कांबळे (महाराष्ट्र ब), तिहेरी – प्रथम शितल लिहीणार, नम्रता चौधरी, प्रज्ञा बोर्डे (महाराष्ट्र अ), द्वितीय वर्षा मोरे, यशांजली गव्हाड, विमल कांबळे (महाराष्ट्र ब), मिश्र दुहेरी – प्रथम यश बोर्डे (मध्य प्रदेश), विमल कांबळे (महाराष्ट्र ब), द्वितीय तेजस मगरे (मध्य प्रदेश) प्रियंका कंकाळे (महाराष्ट्र ब), मिश्र तिहेरी – प्रथम शेख समीर, सोहेल खान, नम्रता चौधरी (महाराष्ट्र अ), द्वितीय ओम सोनवणे, अनुजसिंग राजपुत, वर्षा मोरे (महाराष्ट्र ब)
यावेळी विशाल पवार, समाधान बेलेवार, बाळु पाटील, कौस्तुभ रावल, नितीन बलराज, गौरव ढेंगळे, सुरेश त्रीभुवन, जितेंद्र जाधव यांची विशेष उपस्थिती होती, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रेफ री बोर्डाचे चेअरमन मंगेश सोरटी, राजकुमार दांडगे, उमेशचंद्र खंदारकर, मारूफ खान, नितीन जाधव, युवराज गाढेकर, प्रशांत डोली, गोवर्धन वाहुळ, अमोल सातपुते, तुषार गर्जे, संतोष वाघ, शेख मतीन, शेख समीर, सोहेल खान, शेख सरताज यांनी अथक परिश्रम घेतले.