भोकरदन येथे 20 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा –  1816  रिक्तपदांसाठी भरती 

8

जालना    मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भोकरदन यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.  20  मे, 2023 रोजी सकाळी 09.00 ते 2 वाजेपर्यंत भोकरदन येथील  मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे  “पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन केंद्रिय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते होणार आहे.

या मेळाव्यात पुणे येथील करिअर कोच आणि  मेंटर श्री संतोष जगताप मार्गदर्शन करणार असून दहावी /बारावी/आय.टी.आय./बी.ए./बी.कॉम/ बी.एस सी./एम.कॉम/बी.फॉर्म/ डिप्लोमा व बी.ई./ डिप्लोमा  ॲग्री/बी.एस सी. ॲग्री /एम.एस.सी. ॲग्री /एम.बी.ए/एम.बी.ए./एम.एस.डब्यु. इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक यांचेसाठी एकूण  1816 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 17 कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात शासनामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय संस्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार  आहे. तसेच  व्यवसाय इच्छुकांकरिता स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणा-या शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून  योजनांचे  मार्गदर्शन  करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये एन.आर.बी. बेरिंग लि. जालना यांची 25 पदे, कृषीधन सीड्स प्रा. लि एमआयडीसी, जालना यांची 5 पदे, कलश सीड्स प्रा. लि.  जालना यांची 7 पदे, भूमी कॉटेक्स इंडस्ट्री प्रा. लि.  जालना यांची 16 पदे, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. जालना, यांची 10 पदे, रत्नप्रभा मोटर्स, छ. संभाजीनगर रोड, जालना , यांची 40 पदे, ज्ञानेश्वरी सिक्योरिटी सर्विसेस  जालना यांची 26 पदे, जस्ट डायल लि. पुणे यांची 50 पदे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक  नागपूर (शहरी), यांची 45 पदे, नव-भारत फर्टिलायझर्स लिमिटेड छत्रपती संभाजीनगर,यांची 26 पदे, धूत ट्रान्समिशन प्रा. लि. शेंद्रा, एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर यांची 300 पदे, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स  छत्रपती संभाजीनगर (पर्किन्स इंडिया/ एमएमसी हार्ड मेटल/ देवगिरी फोर्जिंग/ मॉर्गनाईट क्रूसिबल इंडिया छ. संभाजीनगर) यांची 250 पदे, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. (एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि. वाळूज छत्रपती संभाजीनगर) यांची 135 पदे, लॅबोर्नेट सर्व्हिस इंडिया प्रा. लि   (अकार टूल्स लि. /धूत ट्रान्समिशन प्रा. लि / टाटा मोटर्स/ मारुती सुझुकी शोरूम, छ. संभाजीनगर) यांची 438 पदे, क्यूस कॉर्पोरेशन लि. पुणे  (फोर्स मोटर्स लि, आकुर्डी, पुणे / टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे) यांची 300 पदे,  परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर यांची 80 पदे, टॅलेनसेतु सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.  पुणे यांची 60 पदे,अशी एकूण 1816 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 17 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

 या सुवर्ण संधीचा रोजगार  इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यासाठी  विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देण्यासाठी किमान पाच प्रतीत रिझ्युमे/बायोडाटा,  शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह  सकाळी 9 वाजता उपस्थित राहून  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन  आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले आहे.