गोव्यात प्रथमच ‘सी 20 परिषदे’चे आयोजन !

12

    भारताच्या अध्यक्षेतेखालील ‘G20’ या 20 देशांच्या समुहाच्या अंतर्गत C20 अर्थात् ‘सीव्हील 20’ हा संलग्न गट निर्माण करण्यात आला आहेयेत्या 27 मे यादिवशी वास्कोगोवा येथे होणारी C20 परिषद गोवा सरकारसह ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (गोवा)’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवन (नवी दिल्ली)’ या संस्थांच्या पुढाकाराने होणार आहे.

या C20 परिषदेच्या अंतर्गत देशभरात आरोग्यपर्यावरणशिक्षणतंत्रज्ञानपारंपारिक कलासंस्कृतीचे जतन अन् संवर्धन आदी 15 प्रकारचे विविध गट कार्यरत करण्यात आले आहेतत्या 15 पैकी ‘विविधतासर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर गोव्यातील C20 परिषद असणार आहेपंतप्रधान मानरेंद्र मोदी यांनी या C20 परिषदांतील धोरणे आध्यात्मिक दृष्टीकोनांचा अवलंब करून बनवावीतअशी सूचना केली आहेभारतातील C20 परिषदेच्या अध्यक्षस्थानी ‘माता अमृतानंदमयी मठा’च्या संस्थापिका परमपूज्य माता अमृतानंदमयी यांची नियुक्ती करण्यात आली आहेतर गोव्यात होणार्‍या C20 परिषदेतील ‘विविधतासर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर देशविदेशांतील 17 मान्यवर आणि अभ्यासू वक्ते संबोधित करणार आहेतया कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री श्रीप्रमोद सावंतपर्यटनमंत्री श्रीरोहन खवंटे आणि सांस्कृतिकमंत्री श्रीगोविंद गावडे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.