सैन्यदलामध्ये  अधिकारी पदासाठी मोफत पुर्व प्रशिक्षण; 23 मे रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखत 

17

जालना, दि. 12 (जिमाका) :- भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.29 ते ते 7 जुन 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र.53 आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणासाठी जालना येथील जिल्हा सैनिक कार्यालयात दि.23 मे 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे,  असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येतेवेळी फेसबुकवर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेयर पुणे सर्च करुन त्यामधील एसएसबी-53 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रत पुर्णपणे भरुन सोबत आणावी.

एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व  त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टीफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, अशी एक पात्रता आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल [email protected] व दुरध्वनी 02453-2451032 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.