जालना । प्रतिनिधी – शहरातील ऐतिहासिक वास्तू मूर्ती वेसला नगरपालिकातर्फे बेकायदेशीररित्या रात्रीच्या अंधारात जमीनदोस्त करण्यात आले होते, या घटनेचे तपशील एमआयएमचे जालना जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी खासदार तथा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डचे सदस्य इम्तियाज जलील यांना भेटून सांगितले. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी औकाफ बोर्ड व नगर पालिका प्रशासनावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले असल्याचे शेख माजेद यांनी सांगितले आहे. या घटनेला औकाफ बोर्ड च्या काही कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे कारणीभूत असल्यामुळे हे सर्व घडले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी शेख माजेद यांच्या अध्यक्षतेखाली औकाफ बोर्डच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले होते. लवकरच या प्रकरणातील दोषीं विरुद्ध पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन सत्य बाहेर आणणार असल्याचे एमआयएमचेे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी कळविले आहे.