भाजपाने केलेल्या विकास कामाच्या आराखडयानुसार राज्यसरकार कडून जालना महापालीकेला मंजुरी पहीला महापौर भाजपाचा होणार – भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे

12

जालना । प्रतिनिधी – जालना नगर पालीकेला महापालीकाचा दर्जा राज्यशासनाकडून मिळालेली मंजूरी ही भाजपा सरकारने 2014 पासून जालना शहरात केलेले विविध विकास कामाची पावती असून विकास कामाच्या आराखडयानुसारच भाजपा-शिवसेना युती सरकारने जालना नगरपालीकेला महापालीकेचा दर्जा दिला असून आता जालना महापालीकेचा पहिला महापौर भाजपाचाच असणार असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी प्रतिक्रीया देतांना व्यक्त केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठवाडयाच्या अन्य शहराच्या तुलनेत उत्तम कनेक्टीव्हीटी,रेल्वेचे वाढते जाळे, उच्चशिक्षणाच्या सोयी सुविधा,पायाभुत विकासाची कामे, शहराच्या चोहेबाजूने केलेले सिमेंटचे वळण रस्ते आणि जालना शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जालना नगर पालीकेचे महापालीकेत रुपांतर होणे आवश्यक होते. केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहरात कोटयावधी रुपयांचा निधी आणून विविध विकास कामे केल्यामुळे विकास कामाच्या आराखडयानुसार राज्यशासनाने महापालीकेला मंजूरी दिली असून जालनाचे नगर पालीकेतून महापालीकेत रुपांतर झाल्यामुळे प्रशासकीय कामांना सुध्दा गती मिळणार असून आता मुख्याधिकारी एैवजी महापालीकेत स्वतंत्र दर्जाचा अधिकारी मिळणार आहे शिवाय त्याच दर्जाचे उप आयुक्त ही मिळतील त्यामुळे जालना शहराच्या प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे यापुढे होणार्‍या महापालीकेचे निवडणुकीत विविध विकास कामाच्या जोरावर भाजपाचाच पहीला महापौर होणार असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष आ.दानवे यांनी व्यक्त केले राज्यशासनाने जालना नगर पालीकेला महापालीकेचा दर्जा देवून मंजूरी दिल्यामुळे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.