जालना । प्रतिनिधी – गेल्या अनेक महिन्यांपासून जालना महानगर पालिका व्हावी यासाठी हिंदु महासभेच्यावतीने वारंवार निवेदने देऊन, आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालय ते थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला याला यश आले असल्याची भावना हिंदु महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. जालना नगर पालिकेचे महानगर पालिकेत रुपांतर होण्यासंदर्भात आदेश राज्य सरकारने काढले. त्यानंतर श्री सुर्यवंशी यांनी ही भावना व्यक्त केली. ते बुधवार (दि 10) प्रसार माध्यमांशी बोलत होते. श्री सुर्यंवशी यावेळी म्हणाले की, जालना नगर पालिकेची महानगर पालिका व्हावी यासाठी पहिली मागणी हिंदु महासभेने केली. यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर तसेच विभागीय स्तरावर आणि मंत्रालयापर्यंत यासाठी पाठपुरावा केला. वेळोवेळी निवेदने दिले. तसेच चार महिन्यांपुर्वी महापालिका व्हावी यासाठी आंदोलन ही केले. मंत्रालय पातळीवर भेट देऊन ही मागणी केली होती. त्याच दरम्यान, संबंधीत अधिकार्यांनी याबाबत अहवाल मागवत असल्याचे सांगून यावर सकारात्मक विचार करणार असल्याचे आपणास सांगितले असल्याचेही श्री सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. जालना महानगर पालिकेचे मागणी करत असतांना महापालिका होणार असल्याचा विश्वासही निर्माण होत होता. जालन्यातील विविध राजकीय, सामाजिक, विविध संघटनांचा आपल्या मागणीला जाहिर पाठींबा मिळत होता. राज्य शासनाकडून निघालेले आदेश पाहिल्यानंतर हिंदु महासभेच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची भावना यावेळी श्री सुर्यवंशी यांनी व्यक्त केली.