हजयात्रेसाठी जाणार्‍या मुस्लिम बांधवांच्या समस्या निवारणासाठी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचा पुढाकार

35

जालना । प्रतिनिधी – दरवर्षी मराठवाडयातुन पवित्र हजयात्रे साठी 1764 भाविक छत्रपति संभाजीनागर (औरंगाबाद) विमानतळ येथुन जातात. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हुन लागणारा एकुन खर्च व्यक्तिमागे 392738 येतो व मुंबई हुन व्यक्तिमागे 304843 खर्च येतो तर छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) हुन प्रत्येक भाविका मागे 87895 अतिरिक्त खर्च लागतो.
ही फार मोठी तफावत कमी करण्यात यावी किंवा छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) एमीग्रेशन पॉइंट बंद करावे व मुंबई ला शिफ्ट करण्यात यावे असे निवेदन भाजपा अल्पसंख्यक प्रदेश महामंत्री अतिक खान यांच्या सोबत रहनुमा ए हज कमिटी जिल्हा जालनाचे अध्यक्ष हजी शकील खान, हाजी शैख़ विखार, हाजी अब्दुल जब्बार, हाजी शेख नूर,लियाकत अली खान, हाजी अहमद लोहार, इमरान खान, खलीक हुसैन, अकबर खान साहब ,सय्य्द इम्रान, नवाब साहब डांगे, अमजद खान, अमान खान, साहिल खान, मतीन डांगे यांच्या तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना देण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तात्काळ एयरपोर्ट अथॉरिटी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्याशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली व नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व केंद्रीय अल्पसंख्यक, महिला और बाल विकास मंत्री स्मृति जुबिन ईरानी यांना कागदपत्रे पाठवुन हज भाविकांची समस्या बाबत आवगत केले. दोन्ही केंद्रीय मंत्री सोबत दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या समस्याच्या निवारणासाठी लवकरच भेट घेणार.